भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले; उत्पादन मात्र घटले | पुढारी

भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले; उत्पादन मात्र घटले

दिवे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाची तीव्रता आणि पाण्याची टंचाई, यामुळे शेतमालाच्या उत्पादनात घट झाली, तर दुसरीकडे बाजारात शेतमालाच्या आवकेत कमालीची घट झाल्याने सर्वच मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. परिणामी, सर्वसामान्यांना दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या दिवे बाजारात कोथिंबीर व भाजीपाल्याला 20 ते 25 रुपयांच्या आसपास बाजारभाव आहे, तर बाकीची तरकारी देखील 15 ते 20 रुपये पावशेर दराने खरेदी करावी लागत आहे.

बाजारभाव जरी जास्त असला, तरी उत्पादनात देखील कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना देखील उत्पादन खर्च भागविणे अवघड झाले आहे. ग्राहकांकडून भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. मात्र, बाजारात मालाची आवक कमी होत असल्याने आम्हाला देखील चढ्या भावाने खरेदी करावी लागत असल्याचे व्यपारी उत्तम गोळे व सचिन झेंडे यांनी सांगितले

Back to top button