‘पुढारी सहकार महापरिषद’ आज पुण्यात

‘पुढारी सहकार महापरिषद’ आज पुण्यात
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सहकारी पतसंस्था आणि मल्टिस्टेट सोसायट्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन करण्यासाठी दै. 'पुढारी'च्या वतीने शनिवारी (दि. 24) पुण्यात एकदिवसीय 'पुढारी सहकार महापरिषद'चे आयोजन करण्यात आले आहे. या सहकार महापरिषदेचे उद्घाटन सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होईल. पतसंस्था आणि सहकार विभागाच्या संयुक्त चर्चेतून ही परिषद पतसंस्था चळवळीस नक्कीच दिशादर्शक ठरेल.

पुणे-अहमदनगर रस्त्यावरील विमाननगर परिसरातील हॉटेल नोवोटेल येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही महापरिषद होणार आहे. महापरिषदेच्या उद्घाटन प्रसंगी दै. 'पुढारी'चे चेअरमन योगेश जाधव यांच्यासह दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेश वाबळे, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे व सहकारचे अन्य अधिकारी, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव, गो कॅशलेस इंडिया प्रा. लि.चे चेअरमन कृष्णत चन्ने, श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत भालेराव आणि बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे उपस्थित राहणार आहेत.

'पुढारी सहकार महापरिषद'चे मुख्य प्रायोजक दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड असून, महापरिषदेस लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी ही पॉवर्ड बाय, डिजिटल पार्टनर गो कॅशेलस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सहयोगी प्रायोजक श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी, तर समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव व फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट महाराष्ट्र राज्य, बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे सहप्रायोजक आहेत. या सहकार महापरिषदेत पुणे आणि अहमदनगर येथील पतसंस्थांचा सहभाग राहणार आहे.

या महापरिषदेत पतसंस्थांना भेडसावणार्‍या अडचणी आणि उपाययोजनांवर ऊहापोह होईल तसेच प्रामुख्याने सहकारी पतसंस्था चळवळीची सद्य:स्थिती, पतसंस्था व मल्टिस्टेट सोसायट्यांची उत्पन्नवाढ, सहकारी संस्थांना डिजिटलायझेशनमधील संधी, सहकार कायदा आणि ऑडिट तसेच पतसंस्था व मल्टिस्टेट सोसायट्यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन आदींवर तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

राज्यात पतसंस्थांचे मोठे जाळे असून सामान्य खातेदार, ठेवीदारांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिल्याने ही चळवळ गावखेड्यापर्यत रुजली आहे. पतसंस्था चळवळीचेही अनेक प्रश्न, अडचणी असून त्यांच्या सोडवणुकीसाठी दै. पुढारीने सर्वांच्या सहकार्याने सहकार महापरिषदेचे एक चांगले व्यासपीठ उपलब्ध केले आहे. लोकमान्य सोसायटी सहकर क्षेत्राच्या उत्कर्षासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. या ठिकाणी सर्व बाबींवर उहापोह, विचारमंथन होऊन निश्चितच मार्ग निघतील, याची खात्री आहे. पतसंस्था चळवळीच्या महापरिषदेस शुभेच्छा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news