

पिंपरी (पुणे) : रेशनिंगचा तांदूळ खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी ट्रकमधून घेऊन जाणार्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 27 लाख 62 हजारांचा तांदूळ जप्त केला आहे. मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास उर्से टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
अशोक लक्ष्मण सोळसकर (रा. रुही, ता. कोरेगाव, जि. सातारा), सचिन वसंत धुमाळ (रा. भाडवे, ता. कोरेगाव, जि. सातारा), राजू नागनाथ केंद्रे (रा. कदारेवाडी, ता. कंधार, जि. नांदेड), गौरव सुंबे (रा. काळेपडळ, हडपसर, पुणे), शहा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अंमलदार तुकाराम साबळे यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा