पुणे : हिवरे तर्फे नारायणगाव येथे दरोडा ; १४ ते १५ तोळे सोने गेल्याचा अंदाज | पुढारी

पुणे : हिवरे तर्फे नारायणगाव येथे दरोडा ; १४ ते १५ तोळे सोने गेल्याचा अंदाज

नारायणगाव (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  नारायणगाव पोलिस ठाणे हद्दीमधील हिवरे तर्फे नारायणगाव येथील सातपुडा वस्ती येथे गणेश मुरलीधर भोर यांचे घरात रविवारी (दि. १८) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात इसमांनी काठी , कोयता, कुऱ्हाड दाखवून दरोडा टाकला. यामध्ये १४ ते १५ तोळे सोने व २० हजार रोख रक्कम गेली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गणेश मुरलीधर भोर, त्यांचे चुलते शंकर रभाजी भोर, आई रंजना मुरलीधर भोर असे या दरोड्यात जखमी झालेल्या इसमांची नावे असून त्यांच्यावर हिवरे गावातील शिंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी भेट दिली. दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी श्वानाला पाचारण करण्यात आले होते; मात्र यामध्ये मार्ग सापडू शकला नाही.

हे ही वाचा : 

नाशिक : उपनगर परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

नाशिककरांची धुळीपासून होणार सुटका, रस्ते सफाईसाठी सापडला मुहूर्त

Back to top button