पुणे : महसूल विभागातील तहसीलदारांच्या बदल्या | पुढारी

पुणे : महसूल विभागातील तहसीलदारांच्या बदल्या

 पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महसूल विभागाकडून राज्यातील सात तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश उप सचिव अजित देशमुख यांनी जारी केले आहेत. त्यात नाशिक आणि पुणे विभागातील तहसीलदारांचा समावेश आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले शेख फसायोद्दीन यांना तहसीलदार बार्शी (जि. सोलापूर) येथे पदस्थापना देण्यात आली. तसेच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले राजेंद्र ननज यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (महसूल) येथील अजित कुर्‍हाडे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या ठिकाणी बदली करण्यात आली. सुरगाणा तहसीलदार सचिन मुळीक यांची आटपाडी (जि.सांगली) येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली.

पुणे विभागात मोहोळ (सोलापूर)चे तहसीलदार प्रशांत बेडसे यांची बदली तहसीलदार खेड येथे करण्यात आली. तसेच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अभिजित जाधव यांना फलटण तहसीलदार म्हणून पदस्थापना देण्यात आली. दरम्यान, सुनील शेरखाने आणि अजित कुर्‍हाडे यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात येणार आहेत. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील (पुरवठा) तहसीलदार साहेबराव सोनावणे यांची साक्री (जि.धुळे) येथे बदली करण्यात आली आहे.

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले योगेश शिंदे यांना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजना येथे पदस्थापना देण्यात आली. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या तहसीलदार दीपाली गवळी यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील (पुरवठा) तहसीलदार या पदावर बदली करण्यात आली. नाशिक शहर धान्य वितरण अधिकारी नितीन गर्जे यांची नंदूरबार येथे तहसीलदार येथे बदली करण्यात आली.

हे ही वाचा : 

पुणे : आरटीओच्या संगणक प्रणालीत छेडछाड ; दिले नऊ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र

पुणे : प्रयोगशाळांच्या नमुना तपासणी अहवालानंतर कारवाई

Back to top button