बेळगावला येणाऱ्या स्वामीजींच्या वाहनाचा अपघात, दोघांचा मृत्यू | पुढारी

बेळगावला येणाऱ्या स्वामीजींच्या वाहनाचा अपघात, दोघांचा मृत्यू

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा – धर्मांतर बंदी कायदा रद्द करण्याच्या विरोधात बेळगावात विश्व हिंदू परिषदेने आंदोलन आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावात येणाऱ्या स्वामीजींच्या गाडीचा काकतीजवळ अपघात झाला. या अपघातात दोघा सेवकांचा मृत्यू झाला असून स्वामीजी गंभीर जखमी झाले. अपघात झालेले स्वामीजी यांचे नाव काडसिद्धेश्वर असून ते कर्नाटकातील शिवापूर मठाचे स्वामीजी आहेत.

कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात गंभीर जखमी स्वामीजींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावात येणाऱ्या स्वामीजींच्या गाडीला पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बेळगाव तालुक्यातील काकती गावात अपघात झाला.

काकती पोलिसांनी रस्ता अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या स्थळी जाऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले. काडसिद्धेश्वर स्वामीजींवर बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Back to top button