

यवत : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या डॉक्टर सेल अध्यक्षा केडगाव (ता. दौंड) येथील डॉ. वंदना मोहिते यांना पोलिसांच्या कानशिलात लगावली म्हणून यवत पोलिसांनी अटक केली असून, त्यांना दौंड न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पालखी मार्गावर कासुर्डी (ता. दौंड) टोलनाका येथे कर्तव्यावर असणारे पोलिस नाईक नितीन कोहक हे वाहतूक व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी वाहनांना बंदी असतानाही चारचाकी गाडीमधून आलेल्या डॉ. वंदना मोहिते यांनी हाताने पोलिसांनी लावलेले बॅरिकेड काढत पुण्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिस कर्मचारी कोहक यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले असता त्यांनी कोहक यांच्याशी हुज्जत घालून त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे डॉ.वंदना मोहिते यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक माधुरी तावरे करत आहेत.
राष्ट्रवादीकडून दबावाचा प्रयत्न
डॉ. मोहिते यांना अटक करू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी जिल्हा पोलिस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
परंतु, थेट पोलिस कर्मचार्यालाच मारहाण करण्यात आल्याने पोलिसांनी कसलाही दबाव न जुमानता डॉ. वंदना मोहिते यांना अटक केली.
हे ही वाचा :