पुणे : विमाननगर येथे हॉटेलच्या भटारखान्याला आग

पुणे : विमाननगर येथे हॉटेलच्या भटारखान्याला आग

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  विमाननगर येथील हॉटेल सांबरला आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अग्निशमन जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन 15 मिनिटांत आग नियंत्रणात आणली. सायंकाळी 6 च्या सुमारास भटारखान्याला आग लागली. याबाबतची माहिती अग्निशमनदलाला मिळताच ते घटनास्थळी पोहोचले.

आग लागून धुरच धूर झाला होता. या वेळी दोन अग्निशमन वाहने आणि एका पाण्याच्या टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. हॉटेलच्या बाहेर पडण्यास जागा उपलब्ध असल्यामुळे मोठी हानी टळली. आगीत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन अधिकारी सोपान पवार आणि त्यांच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news