पिंपरी : जी-20 येथील महापालिका दालनास विविध देशांच्या प्रतिनिधींची भेट | पुढारी

पिंपरी : जी-20 येथील महापालिका दालनास विविध देशांच्या प्रतिनिधींची भेट

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारी गटाची बैठक पुण्यातील खासगी हॉटेलमध्ये आयोजित केली आहे. त्या ठिकाणी असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दालनास विविध देशांचे प्रतिनिधी भेट देऊन माहिती घेत आहेत. महापालिकेच्या दालनात विविध डिजिटल उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे. या दालनास जपान, चीन, भूतान, झांबिया, नेपाळ आदी देशांच्या प्रतिनिधींनी तसेच केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाच्या प्रतिनिधी व अधिकार्‍यांनी भेटी दिल्या. महापालिकेच्या वतीने अभिजित पाठक, अनुराग तिवारी, आनंदसिंग ठाकूर, बिनिश सुरेंद्र, सुरभी सिंह आदींनी महापालिकेच्या डिजिटल उपक्रमांची माहिती दिली.

महापालिका नागरिकांना सेवा देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा करीत असलेला उपयोग खरोखरच आश्वासक असल्याची भावना या वेळी विविध देशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. महापालिका वापरत असलेल्या डिजिटल सेवा आपल्या देशात देखील कशा प्रकारे वापरता येतील, त्याबाबत प्रतिनिधी माहिती घेत आहेत, असे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवड महापालिका तयार करणार वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन

पिंपरी : महापालिकेच्या तीन रुग्णालयांस प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र

Back to top button