पुणे : धूळ खात पडलेल्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा

पुणे : धूळ खात पडलेल्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांच्या कडेला अनेक महिन्यांपासून धूळ खात उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवरील कारवाई थंडावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या वाहनांचा वाहतुकीला आणि पादचार्‍यांना अडथळा होत आहे. शहरात 15 वर्षांहून अधिक जुन्या झालेली तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. नियमानुसार, संबंधित वाहनमालकांनी ही वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. ती स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने हे मालक ही वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात.

अशी असंख्य वाहने शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्षे धूळ खात उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांनाही सहन करावा लागतो. दुसरीकडे या वाहनांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अशी वाहने हलवण्यासाठी आरटीओच्या मदतीने वाहनमालकांना नोटीस बजावली जाते. नोटीस बजावल्यानंतरही वाहने न हलविल्यास वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाते. मात्र, मागील काही महिन्यांपासून ही कारवाई बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या वाहनांचा वाहतुकीला आणि पादचार्‍यांना अडथळा
होत आहे.

रस्त्याच्या कडेला धूळ खात उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहे. ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
                         – माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका

..

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news