पुणे : डिजिटल हेल्थविषयी चिंता ! | पुढारी

पुणे : डिजिटल हेल्थविषयी चिंता !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जी-20 परिषदेच्या दुसर्‍या दिवशी डिजिटल हेल्थ व हवामान या विषयावर चिंता व्यक्त करण्यात आली. या परिषदेत एकूण चार देशांशी सामाजिक क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जी-20 परिषदेच्या थर्ड मीटिंग ऑफ डिजिटल इकॉनोमिक वर्किंग ग्रुपची परिषद होत आहे. दुसर्‍या दिवशीच्या सत्रात एकूण दीडशे विदेशी अभ्यागतांनी सहभाग घेतला. यात 50 देशांचे प्रतिनिधी दहा प्रकारच्या पॅनल डिस्कशनमध्ये सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने डिजिटल इकॉनॉमीसह बदलते पर्यावरण या विषयावर विविध परिसंवाद झाले.

परिषदेत भारताने आर्मेनिया, सीरिया, सुरिणाम, अँटिग्वा, बर्मुडा या देशांशी सामंजस्य करार केले. या वेळी 60 जागतिक दर्जाचे तज्ज्ञ सहभागी झाले होते. यात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल पेमेंट व न्यायव्यवस्था डिजिटल करणे यावर सविस्तर चर्चा झाली.

डिजिटल शिक्षण यावर मंथन…
दुपारच्या सत्रात डिजिटल शिक्षण यावर तज्ज्ञांनी चर्चा केली. डिजिटल स्पेलिंग फॉर बिल्डिंग ग्लोबल फ्युचर, भाषा विकास व वाणी विकास यांचा डिजिटल माध्यमांशी समन्वय यावरही बारकाईने मुद्दे मांडण्यात आले. डिजिटल हेल्थ आणि हवामानविषयक धोके यावर चर्चा करण्यात आली. श्रीलंकेचे राज्यमंत्री तसेच वर्ल्ड इकॉनोमिक फोरमचे पुरुषोत्तम कौशिक यांनी सहभाग नोंदवला.

Back to top button