चाकण : कांद्याच्या आवकेत घट; दरात किंचित वाढ | पुढारी

चाकण : कांद्याच्या आवकेत घट; दरात किंचित वाढ

अविनाश दुधवडे : 

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकेत घट होऊन भावात किंचित वाढ झाली. इंदूरच्या गाजराची प्रचंड आवक झाली. मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक या पालेभाज्यांसह हिरव्या मिरचीचे भाव कडाडले आहेत. बटाटा, टोमॅटो, लसूण व वांग्याचे भाव स्थिर राहिले आहेत. सातार्‍याहून आले, मुरबाडहून भेंडी व गुजरातहून डांगर भोपळा, तोतापुरी कलमी आंबा व परवलची मोठी आवक झाली. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. जनावरांच्या बाजारात जर्शी गायी, बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्या यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने त्यांचे भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल 4 कोटी, 20 लाख रुपये झाली.

कांद्याची एकूण आवक 2,000 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 600 क्विंटलने घटल्याने भावात 100 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 1,200 रुपयांवरून 1,300 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 1,250 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने घटून कमाल भाव 1,800 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 5 क्विंटलने वाढली व कमाल भाव 8 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 140 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 235 क्विंटलने घटल्याने भावात वाढ झाली. हिरव्या मिरचीला 4 हजार रुपयांपासून 6 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा : एकूण आवक – 2,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,300 रुपये, भाव क्रमांक 2. 1,000 रुपये, भाव क्रमांक 3. 700 रुपये. बटाटा : एकूण आवक – 1,250 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,800 रुपये, भाव क्रमांक 2. 1,500 रुपये, भाव क्रमांक 3. 1,200 रुपये. फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रती 10 किलोंसाठीचे भाव कंसात पुढीलप्रमाणे : टोमॅटो : 290 क्विंटल (1,500 ते 2,000 रु.), कोबी – 215 क्विंटल (500 ते 800 रु.), फ्लॉवर – 197 क्विंटल (600 ते 900 रु.), वांगी – 83 क्विंटल (1,000 ते 2,000 रु.), भेंडी – 135 क्विंटल (2,000 ते 4,000 रु.), दोडका – 63 क्विंटल (3,000 ते 4,000 रु.), कारली – 69 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), दुधीभोपळा – 62 क्विंटल (1,000 ते 2,000 रु.), काकडी – 74 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), फरशी – 69 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), वालवड – 63 क्विंटल (1,500 ते 2,500 रुपये), गवार – 14 क्विंटल (7,000 ते 9,000 रु.), ढोबळी मिरची – 136 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), चवळी – 24 क्विंटल (2,000 ते 3,000 रुपये.), वाटाणा – 55 क्विंटल (5,000 ते 7,000 रु.), शेवगा – 30 क्विंटल (2,000 ते 3,000 रुपये ), गाजर – 130 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.).

पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी : एकूण 16 हजार 650 जुड्या (1,500 ते 1,800 रुपये,), कोथिंबीर – एकूण 28 हजार 950 जुड्या (500 ते 1,500 रुपये,), शेपू – एकूण 3 हजार, 550 जुड्या (800 ते 1,200 रुपये ), पालक – एकूण 4 हजार 260 जुड्या (400 ते 600 रुपये).

जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 48 जर्शी गायींपैकी 32 गायींची विक्री झाली.(15,000 ते 70,000 रुपये,), 110 बैलांपैकी 85 बैलांची विक्री झाली (15,000 ते 50,000 रुपये ), 190 म्हैशींपैकी 140 म्हशींची विक्री झाली.

Back to top button