राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील जाऊळके खुर्द येथील आदिवासी ठाकर समाजाच्या लग्नाच्या वर्हाडाच्या टेम्पोला झालेल्या अपघातात सहा जणांना गंभीर दुखापत झाली. या घटनेत दहा जण जखमी झाले. रविवारी (दि. 11) सायंकाळी सातच्या दरम्यान हा अपघात घडला. जवळके येथील ठाकरवाडीतील लग्नाचे हे वर्हाड होते. चाकण परिसरातून लग्ना उरकल्यानंतर परत येत असताना राजगुरुनगर जवळच्या राक्षेवाडीहद्दीत पुणे- नाशिक महामार्गावर अपघात झाला.
टेम्पोच्या मागच्या चाकाचा टायर फुटल्यामुळे टेम्पो रस्त्यावर उलटला. टेम्पोमधील महिला, लहान मुले, युवक, असे 35 जण रस्त्यावर फेकले गेले. टेम्पोच्या टपावर बसलेले सहा युवक हे थेट रस्त्यावर डोक्यावर पडल्याने त्यांना गंभीर मार लागला. राजगुरुनगरमधील चांडोली ग्रामीण रुग्णालयात, तसेच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
महाळुंगे येथे लग्नकार्यासाठी गेलेले जऊळके बु येथील वर्हाड घरी परतत असताना राजगुरूनगर बायपास येथे टेम्पोचा टायर फुटला. त्यामुळे टेम्पो उलटला. टेम्पोमध्ये तीस ते पस्तीस वर्हाडी बसले होते. यामध्ये समीक्षा साहेबराव गावडे ,संतोष गावडे,रोहित पारधी, साक्षी गावडे, रोहिणी पारधी,कमल गावडे, शिवाजी गावडे, ओम गावडे, साई गावडे,आकांशा गावडे व इतर तीन जण या अपघातात गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी राजगुरूनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले
हेही वाचा