बंदीमुळे मासळीचे दर तेजीतच | पुढारी

बंदीमुळे मासळीचे दर तेजीतच

पुणे : देशाच्या पश्चिम किनारपट्टीक्षेत्रात मासेमारी बंदी लागू झाली आहे. सद्यस्थिती हावडा, ओरिसा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या भागाच्या किनारपट्टीपरिसरातून तुरळक स्वरूपात मासळी बाजारात दाखल होत आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने मासळीच्या दरातील तेजी कायम आहे. बाजारात चिकन, मटण व इंग्लिश अंडी वगळता सर्वांचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. मागणी वाढल्याने इंग्लिश अंडी शेकड्यामागे पाच रुपयांनी वधारल्याचे सांगण्यात आले.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 11) खोल समुद्रातील मासळीची 7 ते 8 टन, खाडीच्या मासळीची 200 ते 300 किलो, तर नदीच्या मासळीची 400 ते 500 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : लहान : 1000-1200, भिला : 1000-1200, हलवा : 1000-1100, सुरमई : 1000-1500, रावस : 1000-1200, घोळ : 800-900, वाम : पिवळी 800-900, काळी 400-480, ओले बोंबील : 250-300. कोळंबी : लहान 280-360, मोठी : 400-600, जंबोप्रॉन्स : 1200-1400, किंगप्रॉन्स : 700-800, लॉबस्टर : 1500-1600, मोरी : 300-360, मांदेली : 160-200, राणीमासा : 240-280, खेकडे : 320-360, चिंबोर्‍या : 480-550.

खाडीची मासळी : सौंदाळे : 280-320, खापी : 360-400, तांबोशी : 480-550, बांगडा : लहान 160-180 मोठा 200-240, खुबे : 120-140, तिसर्या : 240-280. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 440-480, शिवडा : 280-320, खवली : 300-350, आम्ळी : 160-200, खेकडे : 400-480, वाम : 600. मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 240, लेगपीस : 290, जिवंत कोंबडी : 180, बोनलेस : 330. अंडी : गावरान (शेकडा) 890, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 560, डझन 78, प्रतिनग 6.50.

Back to top button