पिंपरी : नेहरूनगरमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून | पुढारी

पिंपरी : नेहरूनगरमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  चिखलीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराचा अज्ञातांनी खून केला. ही घटना शनिवारी (दि. १०) सकाळी नेहरूनगर येथील स्टेडियम जवळ उघडकीस आली. बल्लू उर्फ आदर्श ठाकूर, असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथील स्टेडियम जवळ अज्ञातांनी ठाकूर याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. ठाकूर याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ठाकूर हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button