

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कृषी झोनमध्ये (स. नं. 98) केलेले अनाधिकृत प्लॉटिंग, अंतर्गत रस्ते व बांधकामावर महापालिका प्रशासनाने शुक्रवारी कारवाई केली. यामुळे अनधिकृत प्लॉटिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. लोहगाव येथे अनधिकृत प्लॉटिंग व बांधकाम करणार्यांना प्रशासनाने नोटीस बजावली होती.
या नोटिशीला संबंधितांनी प्रतिसाद न दिल्याने हे बांधकाम व अनधिकृत प्लॉटिंग अंतर्गत तयार करण्यात आलेले सिमेंटचे रस्ते, अशा एकूण 13100 चौरस फूट क्षेत्रावरील अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आले. दोन ब—ेकर, दोन जेसीबी, दोन ग्रॅस कटर, 10 बिगारी यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजित सुर्वे, उपअभियंता हनुमान खलाटे, शाखा अभियंता हेमंत कोळेकर, संदीप धोत्रे, प्रकाश कुंभार आदींनी ही कारवाई केली.
लोहगावचा विकास आराखडा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्या अगोदरच सर्वत्र कृषी झोनमध्ये अनधिकृत प्लॉटिंग, तसेच बांधकामे केली जात आहेत. यापुढे देखील अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.
-हनुमान खलाटे,
उपअभियंता, बांधकाम विभाग, महापालिका
हेही वाचा