

मुंढवा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : घोरपडी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. श्रीनाथनगर येथे मागील तीस वर्षांमध्ये प्रथमच टँकरने पाणी देण्याची वेळ आली. तर भीमनगर येथेही काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून या भागात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने पाणीकपात सुरू केली आहे. मात्र, ठरवून दिलेले वेळापत्रकानुसार या भागात पाणीपुरवठा होत नाही.
त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच आवश्यक त्या ठिकाणी जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लष्कर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी किरण कलशेट्टी यांनी सांगितले की, श्रीनाथनगर येथील जलवाहिनीची दुरुस्ती केली आहे. तसेच सर्वत्र सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तीन तासांच्या पाणीपुरवठ्याचा कालावधी दीड तास केला आहे.
हेही वाचा