पिंपरी : चाकण ‘एमआयडीसी’त पोलिसांची समन्वय बैठक | पुढारी

पिंपरी : चाकण ‘एमआयडीसी’त पोलिसांची समन्वय बैठक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना भेडसावणार्‍या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कंपन्यांच्या पदाधिकर्‍यांशी संवाद साधला. मंगळवारी (दि. 6) सावरदरी येथील ब्रिजस्टोन कंपनीत ही बैठक पार पडली. या वेळी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके, एमआयडीसीचे उपअभियंता चौडेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंतराव बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, तसेच चाकण एमआयडीसी मधील महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी मर्सिडीज कंपनीचे सारंग जोशी, ब्रिजस्टोन कंपनीचे पौरव मेहता, न्यू हॉलंड कंपनीच्या शितल साळुंखे, टाटा मेग्ना कंपनीचे शंकर साळुंखे, मिंडा कंपनी ग्रुपचे राजदाईजे, स्पोल अँटो कंपनीचे सुधीर पाटील व व्हायब्रेट एचआर प्रोफेशनल असोसिएशन पुणे व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रिजचे प्रतिनिधी, तसेच महाळुंगे व चाकण, एमआयडीसी मधील 250 कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीमध्ये पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, माथाडी बोर्डाचे सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके, एमआयडीसी विभागाचे उपअभियंता चौडेकर यांनी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कंपनी प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या अडचणी तत्काळ सोडविण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. बैठकीत विशेषतः औद्योगिक वृध्दीसाठी व गुंतवणूक दारांचे हित व सुरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. कामगार युनियन, माथाडी कामगारांच्या समस्या, माथाडी कामगार कायदा, चारित्र्य पडताळणी, वाहतूक नियोजन व अंमलबजावणी, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरा आदी महत्त्वाच्या विषयांवरही सांगोपांग चर्चा झाली.

चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शंकर साळुंखे यांनी चाकण व महाळुंगे या भागातील एमआयडीसीची माहिती करुन दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंतराव बाबर यांनी
आभार मानले.

हे ही वाचा : 

https://pudhari.news/features/arogya/564332/exercise-formula/ar

https://pudhari.news/features/arogya/564332/exercise-formula/ar

Back to top button