पुणे : खुनाच्या प्रयत्नातील तिघांना बेड्या; दोन पिस्तुले, काडतुसे, कोयता जप्त

पुणे : खुनाच्या प्रयत्नातील तिघांना बेड्या; दोन पिस्तुले, काडतुसे, कोयता जप्त
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे असलेल्या आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना खंडणीविरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुले, काडतुसे, कोयता असा एकूण 81 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी ही पिस्तुले कशासाठी जवळ बाळगली याचा पोलिस शोध घेत आहेत. ओंकार ऊर्फ ओमा तानाजी लोखरे (वय 19, रा. रायकर मळा, धायरी) आकाश ऊर्फ सोन्या गणपत भिकुले (वय 24, रा. नांदेड फाटा, महादेवनगर) आणि राधेमोहन ऊर्फ मुन्ना सिताराम पिसे (वय 19, रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी, त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगाराकडे पिस्तूल असून, तो रेल्वेने परगावी जाणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार अमोल आव्हाड व किरण ठवरे यांना मिळाली. पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तिघांना पुणे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी ओंकार हा सिंहगड रोड ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. आकाश ऊर्फ सोन्या हा हवेली ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक विकास जाधव, यशवंत ओंबासे, किरण ठवरे, अमोल आवाड, सयाजी चव्हाण, हेमा ढेबे, प्रमोद सोनावणे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, प्रवीण ढमाळ, रवीद्र फुलपगारे, विजय कांबळे यांनी केली.

छेडछाडप्रकरणी मॅनेजरसह चार डिलीव्हरी बॉयवर गुन्हा दाखल

विमाननगर परिसरातील ललवाणी प्लाझा येथे झेपटो कंपनीच्या गोदामाजवळ असलेल्या वेगवेगळ्या कार्यालयात ये-जा करणार्‍या महिलांची छेडाछाड काढल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरसह चार ते पाच डिलीव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात 48 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी झेपटो कंपनीचे मॅनेजर सुरज गायकवाड (वय-35), स्टोअर मॅनेजर मोईन हन्नुरे (33) व इतर अनोळखी चार ते पाच डिलीव्हरी बॉय यांच्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 2022 पासून 29 मे पर्यंत घडला. तक्रारदार महिला काम करत असलेल्या ऑफिसच्या इमारतीच्या खाली झेपटो कंपनीचे गोदाम आहे. त्याठिकाणी तक्रारदार व त्यांचे सहकारी इतर महिलांसोबत कामावर येत-जात असताना, कंपनीचे मॅनेजर व स्टोअर मॅनेजर हे कंपनीत काम करणार्‍या डिलीव्हरी बॉय यांना चिथवाणी व फुस लावत होते. त्यानुसार तक्रारदार व इतर महिला कामावर येता-जाता त्यांना नेहमी अश्लील भाषा वापरून, लैंगिक शोषण करण्याचे इराद्याने राहत्या घरापर्यंत पाठलाग करून, जाणीवपूर्वक महिलांसमोर
कपडे बदलत असत. तसेच अश्लील भाषेत संवाद साधत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news