वयाच्या 47 व्या वर्षी दहावीची परीक्षा पास; येरवड्यातील मीरा कोकाटे यांचे यश | पुढारी

वयाच्या 47 व्या वर्षी दहावीची परीक्षा पास; येरवड्यातील मीरा कोकाटे यांचे यश

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येरवडा परिसरातील जय जवाननगर येथे राहणार्‍या मीरा अशोक कोकाटे यांनी वयाच्या 47 व्या वर्षी दहावीची परीक्षा दिली होती. 50 टक्के गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या. शिक्षण घेण्यासाठी वयाची कुठलीच अडचण येत नाही, त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिले आहे. कोकाटे कुटुंबीयांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांच्या दोन्ही मुली पदवीधर झाल्या आहेत.

त्यांचे पती बंडगार्डन ते येरवडा परिरातील डॉ. आंबेडकर सेतू (पूल) येथे रुमाल, टोपी, पावसाळी रेनकोट विक्रीचा व्यवसाय करून घरचा उदरनिर्वाह चालवतात. अशा स्थितीत अशोक कोकाटे यांनी आपल्या पत्नीला प्रेरणा दिली की, त्यांनी दहावीची परीक्षा द्यावी. तसेच त्यांच्या दोन्ही मुलींनीसुध्दा आईने दहावीची परीक्षा द्यावी यासाठी आग्रह धरला. त्यानंतर मीरा यांनी परीक्षेची तयारी करून 47व्या वर्षी दहावीची परीक्षा दिली आणि त्यात त्या उत्तीर्णही झाल्या आहे.

Back to top button