

तळेगाव स्टेशन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंदोरी जवळ वैभव पानसरे यांच्या शेतातील विहिरीमध्ये उदमांजर पडल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला मिळाली. लगेच संस्थेचे सदस्य अविनाश कारले, भास्कर माळी, वैभव वाघ, जिगर सोलंकी तेथे पोहचले. अविनाश कारले यांनी रोप आणि हरणेस घालून विहिरीत उतरून ३ तासात उदमांजराला रिस्क्यु करण्यात यश मिळवले.
याची माहिती त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या संस्थापक निलेश गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे यांना दिली. जियार सोलंकी यांनी त्या रानमांजराची प्राथमिक तपासणी करून लगेच त्याच जागी त्याच्या अधिवासात सोडायला सांगितलं आणि वडगांव वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना कळवून त्या उदमांजराला त्याच्याच अधिवासात सोडून दिले. वैभव पानसरे, राम खराटे, प्रणव रोकडे, धीरज पाटील या स्थानिक नागरिकांची मदतही लाभली.