पुणे : खडकवासला धरणांत पुरेसे पाणी, कपात रद्द कधी?

पुणे : खडकवासला धरणांत पुरेसे पाणी, कपात रद्द कधी?

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : धरणांत साडेसहा अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे पुढील तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा असतानाही महापालिका पाणीकपात रद्द का करीत नाही, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. तर, पाणीकपात आणखी दोन आठवडे तरी करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. जून सुरू झाला असून, मॉन्सून केरळजवळ येऊन पोहचला आहे.

शेतीच्या सिंचनाचे उन्हाळी दुसरे आवर्तन 15 जूनपर्यंत संपणार आहे, तर पालखी सोहळ्यासाठी पुढील दोन दिवस कालव्यातून पाणी सोडावे लागेल. या दोन्हींसाठी दीड टीएमसी पाणी पुरेसे होईल. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत सुमारे साडेचार टीएमसी पाणी शिल्लक राहील. पुणे शहराला दरमहा सुमारे दीड टीएमसी पाणी लागते. ते लक्षात घेतल्यास ऑगस्टअखेरपर्यंत पुणे शहराला लागणारे पिण्याचे पाणी धरणांत शिल्लक असल्याचे दिसून येते. त्यामुळे सध्या पाणीकपात करून धरणांत शिल्लक राहिलेले पाणी सप्टेंबरमध्ये वापरता येईल.

धरणांतील पाणीसाठा
(दि. 3 जूनची स्थिती – टीएमसीमध्ये)

धरण                 साठा       टक्केवारी

टेमघर               0.16            4.35
वरसगाव            3.81           29.74
पानशेत             1.77           16.59
खडकवासला    0.86           43.34
एकूण              6.60           22.63

पुण्यातील पाणीकपात सुरू ठेवण्यात येईल. तिसर्‍या आठवड्यात पावसाचा अंदाज लक्षात घेऊन कपातीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. गेल्या वर्षापेक्षा धरणात सुमारे पाऊण टीएमसी पाणी जादा आहे. मात्र, पाऊस कधी सुरू होतो, ते पाहूनच पाणीकपातीसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ.

– अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे मनपा

शेतीच्या सिंचनासाठी 15 जूनपर्यंत उन्हाळी आवर्तन सुरू राहील, तसेच पालखी सोहळा ग्रामीण भागात असेपर्यंत म्हणजे 17 जूनपर्यंत कालव्यातून पाणी सोडण्यात येईल. धरणात किती पाणी शिल्लक आहे, हे त्या वेळी समजून येईल. पुणे शहराला पाणी कमी पडणार नाही.

– विजय पाटील, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, खडकवासला

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news