पुणे: चाकणला गारांच्या पावसाने झोडपले | पुढारी

पुणे: चाकणला गारांच्या पावसाने झोडपले

महाळुंगे इंगळे, पुढारी वृत्तसेवा: प्रचंड उकाड्यानंतर सोमवारी ( दि २९ मे ) सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण औद्योगिक परिसराला गारांसह अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. शेतात उन्हाळी भुईमूग, ज्वारीची काढणी सुरु असून ज्वारी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. अचानक आलेल्या पाऊस व वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला.

चाकण व औद्योगिक परिसरातील महाळुंगे इंगळे, खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, भाम संतोषनगर, कुरुळी, निघोजे, मोई, खालुंब्रे, बिरदवडी, आंबेठाण या गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटसह परिसरात पाऊस पडला. या पावसामुळे आंब्याच्या कैऱ्यांना फटका बसणार आहे. या पावसानंतर वातावरण आल्हाददायक झाले.

Back to top button