पुणे : पोलिस हवालदाराचा महिलेवर बलात्कार | पुढारी

पुणे : पोलिस हवालदाराचा महिलेवर बलात्कार

पुणे : पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत मैत्री केली. त्यानंतर तिच्या मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवत एका पोलिस हवालदाराने महिलेवर बलात्कार केला. दरम्यान, महिलेच्या विरुद्ध पोलिस हवालदाराने खंडणीची तक्रार दिली असून, त्यात बलात्काराचा खोटा अर्ज देऊन बदनामी करण्याची धमकी देऊन एक लाख रुपये खंडणी घेतल्याचा आरोप केला आहे.

राहुल अशोक मद्देल (वय 42, रा. नाना पेठ), असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस हवालदारााचे नाव आहे. मद्देल हा सध्या हडपसर पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2016 ते 8 डिसेंबर 2021 या कालावधीत घडला. याबाबत एका 40 वर्षांच्या महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी या शिवराणा प्रताप पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्या ठिकाणी मद्देल हा कर्तव्यावर होता. त्याने फिर्यादीसोबत ओळख करून मैत्री केली. त्यानंतर फिर्यादीच्या मुलास व पतीस खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून खराडी येथील लॉजसह इतर ठिकाणी नेऊन बलात्कार केला. पोलिस उपनिरीक्षक मुळुक तपास करीत आहे.

पैसे परत मागितल्यावर बलात्काराची तक्रार…

राहुल मुद्देल याने या महिलेविरोधात खंडणीची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महिला, तिचा पती व आणखी एकावर गुन्हा दाखल केला. महिलेने फिर्यादीशी मैत्री करून घर खरेदी व इतर कारणांसाठी वेळोवेळी 2 लाख 35 हजार रुपये घेतले. फिर्यादीने पैसे परत मागितल्यानंतर त्याच्याविरोधात महिलेने बलात्काराचा खोटा तक्रारी अर्ज देऊन बदनामी करण्याची धमकी दिली. फिर्यादीकडून 1 लाख रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा फिर्यादीविरुद्ध तक्रार अर्ज करून अर्ज परत घेण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

Back to top button