पिंपरी : बेकरी टाकण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बेकरी सुरू करण्याच्या बहाण्याने एकाने महिलेची सव्वातीन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना चर्होली येथे 26 जून 2022 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत घडली. याप्रकरणी महिलेने दिघी पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी जिया उल अन्सारी (35, रा. पिंपरी) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना विश्वासात घेतले. ’केक अ लॉक’ या नावाने बेकरी सुरू करण्याचे आमिष दाखवले. बेकरी सुरू करण्यासाठी मशिन खरेदी करण्याबरोबरच इतर बाबींसाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून रोख व चेकद्वारे तीन लाख 25 हजार रुपये घेतले. त्यानंतर बेकरीचे अॅग्रीमेंट करतो, असे सांगितले; मात्र अद्याप कोणतेही अॅग्रीमेंट न करता आरोपीने परस्पर पैशांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.