धक्कादायक ! वायसीएम रुग्णालयाच्या कचराकुंडीत मृत अर्भक | पुढारी

धक्कादायक ! वायसीएम रुग्णालयाच्या कचराकुंडीत मृत अर्भक

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या कचराकुंडीत स्त्री जातीचे मृत अर्भक सापडले. शनिवारी (दि. 27) सकाळी हा प्रकार घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिला रुग्णालयाच्या मागील प्रवेशद्वाराने परिसरात आली.

तिने अर्भक कचराकुंडीत टाकून पळ काढला. अर्भक काही दिवसांचे असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही बाब पोलिसांना कळविण्यात आली असून, पोलिस या महिलेचा शोध घेत आहेत. तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

Back to top button