पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांची जिथं जास्त ताकद आहे, तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचे. पुण्यात कुणाची ताकद आहे, हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले, यावरून राष्ट्रवादीची ताकद आहे, हे सर्वांना माहीत आहे. महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद त्यांना ती जागा मिळावी. मित्रपक्षाला देखील यावर बोलण्याचा अधिकार आहे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.