देहुगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा : संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखी रथ आणि चौघडा गाडीसाठी बैलजोडीचे अर्ज मागविले होते. त्यासाठी देहू देवस्थानकडे 22 अर्ज दाखल दाखल झाले आहेत. पालखी रथासाठी 18 तर चौघडा गाडीसाठी 4 असे 22 बैलजोडी मालकांनी अर्ज दाखल केले आहेत.
सूरज ज्ञानेश्वर खांदवे (कलवड, लोहगाव), विक्रम भगवान जगताप (वाल्हेकरवाडी, चिंचवड), सागर विलास लोणकर (उत्तमनगर, हवेली), तानाजी तुकाराम दगडे (बावधन, ता. मुळशी), निखिल सुरेश कोरडे (नांदेडगाव, ता. हवेली), संग्राम ऊर्फ रोहन सागर टिळेकर (धायरी, हवेली), गणेश नारायण भुजबळ (टाळगाव, चिखली), जीवन अर्जुन जांभुळकर (हिंजवडी, ता. मुळशी), उमेश सूर्यकांत साखरे (हिंजवडी, ता. मुळशी), महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे (पिंपळे सौदागर), संदीप पोपटराव वाल्हेकर (वाल्हेकरवाडी, चिंचवड), कैलास तुकाराम सातव (वाघोली), ओमराज भानुदास खांदवे (वडूखुर्द, हवेली), प्रशांत प्रकाश शेडगे (भुगाव), बाळकृष्ण बबन साखरे (हिंजवडी, ता. मुळशी), सुरेश दिंगबर मोरे (येलवाडी), बबनराव रमाजी काटे (पिंपळे सौदागर) आणि गुलाबराव आबाजी कुंजीर (पिंपळे सौदागर)
चौघडासाठी : सत्यवान ज्ञानेश्वर जैद (चिंबळी, ता. खेड), रोहिदास नाना बोत्रे (येलवाडी, ता. खेड), जालिंदर यशवंत बोत्रे (देहूगाव), प्रशांत जालिंदर बोत्रे.