पुणे शहराच्या तापमानात 3 ते 4 अंशांनी घट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागराकडून आलेल्या बाष्पयुक्त वार्यांनी शहरातील कमाल तापमानात 4 अंशांनी घट झाली आहे.
बुधवारपासून शहरात बाष्पयुक्त ढगांची गर्दी होण्यास सुरुवात झाली असून, दिवसभराच्या कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली आहे. गुरुवारी शिवाजीनगरचे तापमान 40 वरून 37 अंशांवर, पाषाण 37, लोहगाव 37, चिंचवड 41 वरून 36 अंशांवर खाली आले होते. आगामी आठवडाभर शहरात असेच वातावरण राहणार असून, पारा 40 अंंशांखालीच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.