पुणे : जांभूळवाडी तलावातील माशांचा मृत्यू ड्रेनेज पाण्यामुळे | पुढारी

पुणे : जांभूळवाडी तलावातील माशांचा मृत्यू ड्रेनेज पाण्यामुळे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जांभूळवाडी येथील तलावामधील माशांचा मृत्यू तलावात मिसळणार्‍या ड्रेनेजच्या पाण्यामुळे झाल्याचे चौकशीमधून समोर आले आहे. जांभूळवाडी तलावातील शेकडो मासे अचानक मृत्युमुखी पडल्याचा प्रकार दीड आठवड्यापूर्वी उजेडात आला होता. त्यानंतर पर्यावरणप्रेमींसह, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही तलावास तातडीने भेट देऊन तलावाची स्वच्छता करावी, ड्रेनेजचे पाणी थांबवावे, तसेच माशांच्या मृत्यूप्रकरणी तलावाची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली होती.

त्यानुसार, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून 16 मे रोजी मॉडर्न महाविद्यालयास पत्र पाठवित मत्स्यरोग निदान आणि गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळेकडून जांभूळवाडी तलावाच्या पाण्याची तपासणी केली. महाविद्यालयाकडून या पाण्याचे नमुने चार वेगवेगळ्या वेळांना घेऊन ही तपासणी करण्यात आली. त्यातून, या तलावात येणार्‍या ड्रेनेजच्या पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचा अहवाल सादर केला.

अहवालातील निष्कर्ष

  • तलावात परिसरातील सोसायट्यांचे ड्रेनेज पाणी थेट तलावात येते
  • तलावात गाड्या धुणे, कपडे धुणे, बांधकामांचा राडारोडा टाकणे यामुळेही प्रदूषण वाढले.
  • उन्हामुळे सकाळी आणि रात्री वाढलेले पाण्याचे तापमान
  • पाण्यामधे ऑक्सिजन अतिशय कमी
  • तलावात खारट पाण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले.
  • तलावात विषारी धातूंचे प्रमाण आढळून आले.

Back to top button