Latest
मोखा चक्रीवादळाने पळवला देशातील मान्सूनपूर्व पाऊस; एवढ्या टक्क्यांनी घटले पावसाचे प्रमाण
पुणे; पुढारी वृततसेवा : मे महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या मोखा चक्रीवादळाने देशातील मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणावर पळवून नेल्याने या काळात पडणार्या पावसात 50 ते 85 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यंदा मार्च व एप्रिलमध्ये देशभरात भरपूर पाऊस बरसला. मात्र, मे महिन्यात आलेल्या मोखा चक्रीवादळाने मे महिन्याची सरासरी उणे गटात नेऊन बसवली आहे. तरी 1 मार्च ते 17 मेपर्यंत अवकाळी पावसाचा ताळेबंद तपासला असता, असे लक्षात येते की, देशात मे महिन्यात कमी पाऊस पडूनही संपूर्ण उन्हाळ्यात सरासरीच्या 16 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
उष्णतेची लाट झाली तीव्र…
मोखा चक्रीवादळाने हवेतील बाष्प पळवल्याने मे महिन्यातील मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणावर कमी झाला. तसेच उष्णतेची लाटही तीव्र झाली.
11 ते 17 मेदरम्यान घटला पाऊस (मि. मी. मध्ये)
भाग नेहमी पडतो प्रत्यक्षात पडला तफावत
पूर्वोत्तर भारत 39.8 18.8 53 टक्के कमी
उत्तर पश्चिम भाग 2 8.2 75 टक्के
मध्य भारत 0.7 4.5 85 टक्के
दक्षिण भारत 6 16.1 62 टक्के
संपूर्ण देशात 13.6 5 63 टक्के
1 मार्च ते 17 मे काळातील पाऊस
भाग नेहमी पडतो प्रत्यक्षात पडला तफावत
पूर्वोत्तर भारत 276.6 181.9 34 टक्के
उत्तर पश्चिम 98.6 111.1 13 टक्के जास्त
मध्य भारत 26.1 74.8 1 86 टक्के जास्त
दक्षिण भारत 85.4 138.5 62 टक्के जास्त
संपूर्ण देशात 100 115.5 16 टक्के अधिक

