रस्त्यावर दिवे असूनही अंधार दाटतो…! सोलापूर महामार्गावर फांद्यांमुळे प्रकाश झाकोळला; पथदिव्यांची गरज

रस्त्यावर दिवे असूनही अंधार दाटतो…! सोलापूर महामार्गावर फांद्यांमुळे प्रकाश झाकोळला; पथदिव्यांची गरज

सुनील जगताप

पुणे: सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी पथदिव्यांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे पथदिवे अस्तित्वात आहेत, त्यांचा प्रकाश बाजूच्या वृक्षांच्या फांद्यांमुळे झाकोळलेला आहे. सोलापूर महामार्गावर पुलगेटपासून हडपसरपर्यंत तब्बल 87 पथदिवे उभारण्यात आलेले आहेत. रेसकोर्स आणि भैरोबानाला परिसरामध्ये पथदिवेच नसल्याने त्या ठिकाणी अंधार पसरलेला असतो, तर काही भागांमध्ये मधोमध पथदिवे असल्याने सर्वत्र प्रकाश पडताना दिसून येत नाही. पुलगेटपासून सोलापूर महामार्गाकडे जाताना रेसकोर्सजवळील वृक्षांच्या फांद्यांमुळे पथदिवे झाकले गेले आहेत, तर रेसकार्सच्या पुढील बाजूस पथदिव्यांचा खांब नसल्याने त्या ठिकाणी अंधार पसरलेला असतो.

फातिमानगरपासून बी. टी. कवडे रोडदरम्यान वृक्षांची संख्या अधिक असल्याने त्या ठिकाणी पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर जाणवत नाही. परिणामी, अंधुक प्रकाशातच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. वैदुवाडी चौक आणि मगरपट्टा चौकामध्येही वृक्षांच्या मोठ्या फांद्यांमध्ये पथदिवे हरविल्याने अंधुक प्रकाश असतो. या रस्त्यावरील पथदिव्यांच्या व्यवस्थेकडे प्रशासनाने सर्रास दुर्लक्ष केले आहे.

अनेक ठिकाणी दुरुस्तीचे काम

गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवरील पथदिवे दुरुस्तीचे काम सुरू आहे. भैरोबानाला ते रामटेकडी पुलापर्यंतच्या पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर सुरू असून, अनेक पथदिवे सुरू करण्यात आलेले आहेत.

पथदिव्यांबाबत तुमचे अनुभव कळवा…

पुणेकरांनो, पथदिव्यांच्या दिव्य स्थितीचे आणि सोसाव्या लागणार्‍या गैरसोयींचा आँखो देखा हाल 'टीम पुढारी'ने तुमच्यासमोर मांडला आहे. पुण्यात रात्री प्रवास करताना तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो? ते थोडक्यात 'पुढारी'ला 9823158113 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपने कळवा आणि फोटोही पाठवा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news