पिंपरी : पालिका नोकरभरतीसाठी राज्यभरात 98 परीक्षा केंद्र | पुढारी

पिंपरी : पालिका नोकरभरतीसाठी राज्यभरात 98 परीक्षा केंद्र

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गट ‘ब’ व ‘क’ वर्गातील एकूण 388 पदांसाठी तब्बल 85 हजार 771 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्याची ऑनलाइन परीक्षा तब्बल 9 महिन्यांनंतर शुक्रवार (दि.26), शनिवार (दि. 27) आणि रविवार (दि.28) असे तीन दिवसांच्या तीन सत्रात होणार आहे. त्यासाठी राज्यभरातील 26 शहरात एकूण 98 परीक्षा केंद्र आहेत.पालिकेने एकूण 388 जागांसाठी 14 ऑगस्ट 2022 पासून अर्ज मागविले होते. त्याला मोठा प्रतिसाद लाभला.

त्यांच्याकडून प्रत्येकी 1 हजार रुपये परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे. परीक्षा शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर होणार आहे. परीक्षा प्रवेशपत्र (हॉल तिकीट) पालिकेच्या ुुु.लिालळपवळर.र्सेीं.ळप संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यामध्ये एकूण 26 शहरातील 98 परीक्षा केंद्रांत ही परीक्षा होणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पालिकेच्या अधिकार्‍यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसविण्यात आले आहेत.

केंद्रावरील कॉपी व इतर गैरप्रकार रोखण्यासाठी फ्रॉक्सींग, सीसीटीव्ही कॅमेरे, आयआरआयएस स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रांवर आवश्यक प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

15 पदांसाठी 388 जागा

अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अ‍ॅनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) या 15 पदांसाठी एकूण 388 जागेसाठी ही नोकरभरती आहे. त्यासाठी राज्यभरातून तब्बल 85 हजार 771 अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहेत.

आमिषाला बळी पडू नका; पालिकेचे आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिका ही नोकरभरती केली जात आहे. त्यासाठी परीक्षा पारदर्शक पध्दतीने आयोजित केली आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला किंवा गैरप्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, म्हणून पालिकेने संपूर्ण तयारी केली आहे. परीक्षा केंद्र व त्यासंदर्भातील सविस्तर माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

Back to top button