पिंपरी : व्यावसायिकाची 41 लाखांची फसवणूक | पुढारी

पिंपरी : व्यावसायिकाची 41 लाखांची फसवणूक

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सौर उर्जेच्या उपकरणांसाठी आवश्यक कच्चा माल विक्रीच्या बहाण्याने एका व्यवसायिकाची तब्बल 40 लाख 89 हजार 148 रुपयांची फसवणूक झाली आली. ही घटना शनिवार (दि.13) कस्पटे वस्ती वाकड येथे घडली. या प्रकरणी पवन जालिंदर रणपिसे (25. रा. रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात शनिवार (दि.20) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी इलेश शाहा (32), सुनील कांतीलाल शाहा (66) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीत कच्चा मालाची खरेदी करणारी महिला यांना आरोपी इलेश शाहा यांनी फोन केला. तसेच ते कच्चा मालाची विक्री करतात असे खोटे सांगून सौर उर्जाच्या कच्चा मालाची विक्रीचा व्यवहार 40 लाख 89 हजार 148 रुपयांना ठरवला. सर्व पैसे भरल्यानंतर कच्चा माल पाठवला जाईल, असे आरोपीने सांगितले. फिर्यादी यांच्या कंपनीच्या बँक खात्यातून 40 लाख 89 हजार 148 रुपये एवढी रक्कम आरोपींना ऑनलाईन पद्धतीने दिले. मात्र, आरोपींनी कच्चा माल न देता फिर्यादीची फसवणूक केली. याविरोधात फिर्यादीने वाकड पोलिसांत फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button