पिंपरीतील वल्लभनगर आगारात गाड्यांसाठी जागा अपुरी

पिंपरीतील वल्लभनगर आगारात गाड्यांसाठी जागा अपुरी

पिंपरी(पुणे) : पिंपरी येथील वल्लभनगर आगारामध्ये इतर आगारातील मुक्कामी थांबणार्‍या बस उभ्या केल्या जातात. काही बस शिवाजीनगर तर काही स्वारगेट डेपोमधील आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष वल्लभनगर डेपोतील गाड्यांना उभ्या करण्यास जागाच उरत नाही. परिणामी सकाळच्या वेळेस वल्लभनगर आगारात मार्गस्थ होणार्‍या गाडयांना जागादेखील मिळत नाही.

वल्लभनगर आगारात डेपोच्या 55 बस तर इतर सुमारे अडीचशे ते तीनशे बस पार्क केल्या जात आहेत. यामधील काही शिवाजीनगर व स्वारगेट डेपोतील बस आहेत. या बस वल्लभनगर आगारामधून सुटणार्‍या नाहीत, तरीदेखील जागेअभावी डेपोमध्ये लावण्यात येतात. परिणामी सकाळी आणि सायंकाळी येथे प्रवाशांना ये-जा करणे देखील अडचणीचे ठरते.

गेल्याच आठवड्यात वर्कशॉपपर्यंत बस उभ्या केल्यामुळे जागेवर जाऊन बसची तपासणी करणार्‍या महिला कर्मचार्‍याचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच काही अपंग कर्मचारीही आगारात काम करीत आहेत. त्यांना आगारात आल्यावर मोठी कसरत करावी लागते. मात्र तरीदेखील याबाबत प्रशासन दखल घेत नाही. इतर आगारातील बस सर्रासपणे वल्लभनगर आगारात उभ्या केल्या जातात. त्यामुळे येथील अतिरिक्त गाड्या हलविण्यात याव्यात, अशी मागणी कर्मचार्‍यांकडून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news