पिंपरी : स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय; दोघांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय; दोघांवर गुन्हा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये दोन महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि. 18) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नवी सांगवीतील कृष्णानगर येथे करण्यात आली. कुणाल राममूर्ती रेड्डी (39, रा. बोपोडी, पुणे) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक मारुती करचुंडे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला. आरोपींनी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये स्पा मालक कुणाल रेड्डी आणि एक महिला या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button