वडगाव मावळ : कान्हे रेल्वे स्थानकाजवळ डोक्यात दगड घालून खून | पुढारी

वडगाव मावळ : कान्हे रेल्वे स्थानकाजवळ डोक्यात दगड घालून खून

वडगाव मावळ(पुणे) : एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास कान्हे रेल्वे स्थानकाजवळ घडली. भागुजी बाबूराव काटकर (वय 54 , रा. पारवडी, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार भागुजी काटकर (वय 19, रा. पारवडी, ता. मावळ) याने वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अज्ञात आरोपीने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून भागुजी बाबूराव काटकर यांच्या डाव्या कानावर तसेच, डोक्यात दगडाने मारहाण करून खून केला. घटनास्थळी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक, पोलिस निरीक्षक विलास भोसले व पोलिस अंमलदारांनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. काटकर हे महिंद्रा कंपनीत रात्रपाळी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. त्यांची दुचाकी व मोबाईल चोरीला गेला आहे.

Back to top button