पिंपरी : नोकरीचे आमिष दाखवून 13 लाखांची फसवणूक | पुढारी

पिंपरी : नोकरीचे आमिष दाखवून 13 लाखांची फसवणूक

पिंपरी(पुणे) : एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून, लिंक पाठवत वेगवेगळ्या टास्कद्वारे महिलेला 13 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 3 ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.18) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रकाश दास, तीन महिला आरोपी व विविध बँक खातेधारक अशा 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नोकरीचे आमिष दाखवून आरोपींनी विविध लिंक पाठवून टास्क दिले. त्यानुसार, आरोपींनी टास्कद्वारे महिलेकडून 9 लाख 75 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या नफ्याची रक्कम परत न देता त्यांनी एकूण 13 लाख 45 हजार 500 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button