पुण्यातही ‘अर्बन फूड पायलट’; सात ठिकाणी आठवडी बाजाराचा प्रकल्प

पुण्यातही ‘अर्बन फूड पायलट’; सात ठिकाणी आठवडी बाजाराचा प्रकल्प

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने शहरात 'अर्बन फूड पायलट' हा आठवडी बाजाराचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. विविध सात ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे. या ठिकाणी नागरिकांना स्वच्छ, ताजी, विषमुक्त, फळे व भाजीपाला वाजवी दरात मिळणार आहेत. पुढील आठवड्यापासून हा उपक्रम सुरू होणार आहे. जागतिक बँकेच्या अनुदानातून तसेच शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या प्रकल्पातील शेतकरी आठवडे बाजारांच्या दर्जामध्ये सुधारणा करतील. शहरी भागातील ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावा व शेतमालाला चांगला दर मिळावा, असा या उपक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमासाठी नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनाही करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.पुढील आठवड्यापासून हा उपक्रम सुरू होणार आहे.

जागतिक बँकेच्या अनुदानातून तसेच शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पातील शेतकरी आठवडे बाजारांच्या दर्जामध्ये सुधारणा करतील. शहरी भागातील ग्राहकांना विषमुक्त आणि ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावा व शेतकर्‍यांच्या शेतमालाला चांगला दर मिळावा, असा या उपक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमासाठी नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनाही करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

या ठिकाणी होणार अर्बन फूड पायलट

1) बाणेर ओटा मार्केट- बाणेर – शनिवार
2) सन सिटी ओटा मार्केट, वडगाव बुद्रुक – गुरुवार
3) आंबेगाव बु. ओटा मार्केट, आंबेगाव – मंगळवार
4) खराडी ओटा मार्केट, खराडी – रविवार
5) पुण्यनगरी ओटा मार्केट, वडगाव शेरी, – सोमवार
6) कुरुंजाई ओटा मार्केट, कळस – बुधवार
7) धानोरी ओटा मार्केट, धानोरी – शुक्रवार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news