पुण्यातील हवामान शास्त्रज्ञाने तयार केले मान्सून मिशन मॉडेल | पुढारी

पुण्यातील हवामान शास्त्रज्ञाने तयार केले मान्सून मिशन मॉडेल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उष्णतेची लाट असो, नाही तर धो-धो पाऊस याचा अंदाज फार आधी देता येत नव्हता. मात्र, आता ते शक्य झाले असून, नैसर्गिक आपत्तीचा अंदाज 3 ते 4 तास आधी देता येईल. हे संशोधन पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतील (आयआयटीएम)चे शास्त्रज्ञ डॉ. सूर्यचंद्रा राव यांनी केले आहे. डॉ. राव हे पुणे आयआयटीएम या संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ असून, त्यांनी मान्सून मिशन मॉडेल नावाचे नैसर्गिक आपत्ती पासून बचाव करणारे मॉडेल विकसित केले आहे. त्यातूनच मान्सूनचा अंदाज दिला जातो. यात दीर्घकालिन पावसाचा अंदाज, शेतकरी, वीज कंपन्यांसाठी या मॉडेलचा उपयोग होऊ लागला. यात आता यात नैसर्गिक आपत्तीची सूचना देणारी प्रणाली विकसित करण्यात यश आले आहे.

हे अंदाज आता देणे शक्य…

या मॉडेलमध्ये उष्णतेची लाट, थंडीची लाट, ढगफुटी, अतिवृष्टी, हिमवादळ, हिमवृष्टी, चक्रीवादळ याचा अंदाज देता येईल.

सेंसर देणार माहिती…

शहरात पावसाचे पाणी तुंबले जाऊन अनेक वेळा पूर परिस्थिती निर्माण होते, अशावेळी अतिसंवेदनशील भागांचा सर्व्हे करून त्या ठिकाणी सेंसर बसवले जाणार आहेत. ते सेंसर्स त्या-त्या भागातील नैसर्गिक आपत्तीचे अंदाज देतील.

Back to top button