घामाघूम पुणेकरांना गारव्याने दिलासा, कमाल तापमानाचा पारा घसरला | पुढारी

घामाघूम पुणेकरांना गारव्याने दिलासा, कमाल तापमानाचा पारा घसरला

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या खाली आला असून, परिणामी नागरिकांना तीव्र उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुढील काही दिवस निरभ्र आकाश, तर रविवारपासून संध्याकाळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढेच होता. त्यामुळे अगदी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारी बारा वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तीव्र उष्णतेमुळे उकाडा चांगलाच जाणवत होता. मात्र, बुधवारी दिवसभर उकाडा असला तरी निरभ्र आकाश, कोरडे हवामान आणि वारे वाहत असल्यामुळे शहरातील कमाल तापमानात थोडीशी घट झाली आहे. बुधवारी शहराचे कमाल तापमान 39 अंशांवर होते. दरम्यान पुढील 23 मेपर्यंत कमाल तापमान 39 ते 40 अंशांच्या आसपास राहील.

Back to top button