पुणे: आषाढी वारीपर्यंत आळंदी देवस्थानच्या तीनही विश्वस्तांना मुदतवाढ | पुढारी

पुणे: आषाढी वारीपर्यंत आळंदी देवस्थानच्या तीनही विश्वस्तांना मुदतवाढ

आळंदी (पुणे), पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी आळंदी देवस्थानच्या कार्यकाल पूर्ण झालेल्या तीनही विश्वस्तांना पुणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी मुदतवाढ दिली असल्याची माहीती विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली. विश्वस्तांना तीन महिने मुदत वाढ दिली आहे.

विश्वस्त विकास ढगे पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, योगेश देसाई यांचा १६ मे पर्यंत कार्यकाळ होता. देवस्थानची एकूण विश्वस्त संख्या सहा आहे. सहा ही विश्वस्तांची मुदत संपली असून सध्या सहा पदे रिक्त होत आहेत. या सहा पैकी तीन विश्वस्त पदे पहिल्या टप्प्यात भरली जाणार आहे. मात्र, अवघ्या वीस – पंचवीस दिवसांवर आषाढी पायी वारी सोहळा आला आहे. या दरम्यान विश्वस्त पदे रिक्त असणे अडचणीचे ठरणारे होते. या हेतूने सध्याच्या विश्वस्तांना मुदत वाढ मिळाली आहे. मुदत वाढ मिळाल्याने यंदाचा पायी वारी सोहळा याच विश्वस्तांच्या देखरेखीखाली पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button