कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेकडे पुरुषांची पाठ ! | पुढारी

कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेकडे पुरुषांची पाठ !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सरत्या वर्षात शहरात 8428 कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण केवळ 254 इतके आहे. अजूनही कुटुंब नियोजनामध्ये महिलांचेच प्रमाण लक्षणीय असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत असल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे. कुटुंबकल्याण कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, महिलांचे प्रमाण 97 टक्के, तर पुरुषांचे प्रमाण केवळ 3 टक्के आहे. पौरुषत्वावर परिणाम होईल अशा भीतीने अजूनही पुरुषांकडून कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे टाळले जात आहे.

सुशिक्षित व पुढारलेल्या शहरातील परिस्थिती धक्कादायक असून, नसबंदी शस्त्रक्रियेबाबत जनजागृती करण्याची गरज अधोरेखित होत आहे. कुटुंबनियोजनासाठी शासनातर्फे दरवर्षी मोहीम राबवण्यात येते. यासाठी उद्दिष्टही ठरवले जाते. यासाठी शासनातर्फे शस्त्रक्रिया करणार्‍यांना अनुदानही दिले जाते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील तसेच दारिद्य्ररेषेखालील महिलांना शासनातर्फे 600 रुपये तर इतर महिलांना 250 रुपये शस्त्रक्रियेसाठी अनुदान दिले जाते. तर पुरुषांना नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी 1,100 रुपये मिळतात.

..

Back to top button