पुणे : मध्यरात्री कारचालकाला लुटणारी टोळी जेरबंद | पुढारी

पुणे : मध्यरात्री कारचालकाला लुटणारी टोळी जेरबंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मध्यरात्री कारचालकाला लुटणार्‍या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये एका तडीपार आरोपीचा सहभाग आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली 30 हजार रुपये किमतीची सोनसाखळी जप्त केली आहे. ही घटना 28 एप्रिलला आंबेगाव पठार परिसरात घडली होती. समीर रज्जाक शेख (वय 23) आणि सिद्धार्थ विजय गायकवाड (वय 21, दोघेही रा. अण्णा भाऊ साठेनगर, अरण्येश्वर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील सिद्धार्थ हा तडीपार होता, तरीदेखील त्याने शहरात येऊन हा गुन्हा केल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी हे चारचाकीतून घरी निघाले होते. लघुशंका आल्याने ते आंबेगाव पठार परिसरात थांबले होते. त्या वेळी तिघांनी अडवून मारहाण करीत त्यांच्याकडील 26 हजारांचा ऐवज चोरून नेला होता.

त्यानंतर चोरट्यांनी चिंतामणी ज्ञानपीठसमोरून टँकरचालकाचा मोबाईल हिसकावून नेला होता. आरोपींचा शोध घेत असताना पोलिस कर्मचारी अभिनय चौधरी, अवधूत जमदाडे, मितेश चोरमोले यांना माहिती मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ यांच्या पथकाने समीर आणि सिद्धार्थला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, कर्मचारी हर्षल शिंदे, सचिन गाडे, मंगेश पवार, धनाजी धोत्रे, अभिजित जाधव, शैलेश साठे, नीलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली.

Back to top button