पुणेकरांनो ! उद्या शहराचा पाणीपुरवठा बंद | पुढारी

पुणेकरांनो ! उद्या शहराचा पाणीपुरवठा बंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहराचा पाणीपुरवठा उद्या गुरुवारी (दि. 18) बंद राहणार आहे. यंदा पाऊस लांबणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आठवड्यात एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लाबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे यंदा पावसाचे प्रमाण देखील कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनीच पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना यावर्षी 31 जुलैपर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नियोजन केले असून, त्यासाठी ऑगस्टपर्यंत अथवा पुरेसा पाऊस पडेपर्यंत दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Back to top button