पुणे : बाजारात कांदा, लसूण, टोमॅटोची आवक वाढली

पुणे : बाजारात कांदा, लसूण, टोमॅटोची आवक वाढली

चाकण (पुणे ) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, लसूण व टोमॅटोची आवक वाढली. पालेभाज्यांचे भाव तेजीत राहिले. बटाट्याची आवक स्थिर राहून भावात घट झाली. साता-याहून आले, मुरबाडहून भेंडी व गुजरातहून तोतापुरी कलमी आंब्यांची आवक झाली.

जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व म्हैस यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल 3 कोटी 60 लाख रुपये झाली. कांद्याची एकूण आवक 6,000 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 1 हजार क्विंटलने वाढली व भावात 100 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 1,000 रुपयांवरून 900 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1,250 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक स्थिर राहून भावात 200 रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव 2,000 रुपयांवरून 1,800 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक स्थिर राहून कमाल भावही 7 हजार रुपयांवर स्थिरावला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक 225 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 180 क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला 2 हजार रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे –

कांदा – एकूण आवक – 6,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 900 रुपये, भाव क्रमांक 2. 700 रुपये, भाव क्रमांक 3. 500 रुपये. बटाटा : एकूण आवक – 1,250 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,800 रुपये, भाव क्रमांक 2. 1,400 रुपये, भाव क्रमांक 3. 1,300 रुपये.

फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे
टोमॅटो : 230 क्विंटल (600 ते 1,000 रुपये), कोबी – 235 क्विंटल (500 ते 800), फ्लॉवर – 225 क्विंटल (800 ते 1,200), वांगी – 92 क्विंटल (1,500 ते 2,500), भेंडी – 135 क्विंटल (2,000 ते 4,000), दोडका – 63 क्विंटल (3,000 ते 4,000), कारली – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा – 62 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी – 74 क्विंटल (2,000 ते 3,000), फरशी – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), वालवड – 63 क्विंटल (1,500 ते 2,500), गवार – 14 क्विंटल (7,000 ते 9,000), ढोबळी मिरची – 136 क्विंटल (2,000 ते 3,000), चवळी – 24 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा – 60 क्विंटल (6,000 ते 7,000), शेवगा – 55 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर – 108 क्विंटल (1,000 ते 1,500).

पालेभाज्या – पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी : एकूण 39 हजार 950 जुड्या (500 ते 1,000 रुपये), कोथिंबीर – एकूण 28 हजार 580 जुड्या (500 ते 900 रुपये), शेपू – एकूण 4 हजार, 850 जुड्या (600 ते 1,000 रुपये), पालक – एकूण 3 हजार 870 जुड्या (600 ते 800 रुपये).

जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 45 जर्सी गाईंपैकी 27 गाईंची विक्री झाली. (10,000 ते 70,000 रुपये), 110 बैलांपैकी 75 बैलांची विक्री झाली (10,000 ते 45,000 रुपये), चाकणला विक्रीसाठी आलेल्या 110 म्हशींपैकी 80 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 30 हजार ते 80 हजार रुपये भाव मिळाला. शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत घट झाली. विक्रीसाठी आलेल्या 10,430 शेळ्यापैकी 9,975 शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news