पुण्यात गुंतवणुकीच्या बहाण्याने कोटींची फसवणूक | पुढारी

पुण्यात गुंतवणुकीच्या बहाण्याने कोटींची फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुजरात ओएनजीसी कंपनीमध्ये 50 कोटींचे टेंडर देतो, असे सांगून गुंतवणुकीच्या बहाण्याने दाम्पत्याने 1 कोटी 27 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच कोरे धनादेश चोरून चोरट्यांनी 2 कोटी
57 लाखदेखील चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे. धर्मेश प्रफुल्लचंद्र शहा, आश्लेषा धर्मेश शहा (दोघेही रा. अपेक्षा पार्क सोसायटी, बडोदा, गुजरात) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत विक्रम रघुनाथ नलावडे (46, रा. पिनॅक गंगोत्री सोसायटी, औंध) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2022 दरम्यान घडल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पती-पत्नी असून, त्यांनी डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2022 या कालावधीत संगनमत करून फिर्यादी यांना धर्मेश शहा याने गुजरात येथील ओएनजीसी कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे लेटरहेड दाखविले. त्याच आधारे त्यांनी नलावडे यांना कंपनीमध्ये 50 कोटींचे टेंडर देतो, असे खोटे सांगून नलावडे यांच्याकडून वेळोवेळी रोख व आरटीजीएस स्वरूपात 1 कोटी 27 लाख 50 हजार घेतले. परंतु, त्यांना कोणत्याही प्रकारे गुजरात येथील ओएनजीसी कंपनीचे टेंडर न देता तसेच दिलेले पैसे परत न करता विश्वासघात करून फिर्यादीची फसवणूक केली. तसेच नलावडे यांचा एक सही केलेला धनादेश चोरून त्यावर 2 कोटी 57 लाख 69 हजारांची रक्कम टाकून तो धनादेश वटविण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फ

Back to top button