पुणे : हनुमानाची आरती करून आनंदोत्सव; काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना भरविले लाडू | पुढारी

पुणे : हनुमानाची आरती करून आनंदोत्सव; काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना भरविले लाडू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव काँग्रेस पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर गावठाणातील हनुमान मंदिरात आरती करून एकमेकांना लाडू भरवून साजरा केला. काँग्रेस भवन प्रांगणात कार्यकर्त्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत काँग्रेसच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या वेळी आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, अ‍ॅड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपचा अहंकार कर्नाटकच्या मतदारांनी उतरवला आहे. भाजप देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे. या देशाला काँग्रेसच वाचवू शकते, हा विश्वास जनसामान्यांत निर्माण झाल्याचे मत धंगेकर यांनी व्यक्त केले. ही निवडणूक 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील सत्तापालटाची नांदी आहे. धार्मिक उन्माद वाढविण्यावर भाजपने भर दिला. मात्र महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याला विटलेल्या मतदारांनी भाजपला सत्तेवरून दूर फेकले, असे मत जोशी यांनी व्यक्त केले.

Back to top button