मी तर लहान लोकांचीच नेता : पंकजा मुंडे | पुढारी

मी तर लहान लोकांचीच नेता : पंकजा मुंडे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : समाजातील लहान असलेल्या घटकांचीच मी नेता आहे. जो घटक वंचित आहे. वर्षानुवर्षे अडचणींचा सामना करत जगत आहे. अशाच सर्वसामान्य माणसाची मी नेता असल्याचे मत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दै. ‘पुढारी’ बरोबर बोलताना व्यक्त केले.

सावरगाव या ठिकाणी झालेल्या दसरा मेळाव्यात बोलत असताना विरोधी पक्ष सरकार पाडणार आणि सत्ताधारी पक्ष सरकार पाच वर्षे टिकणार असे बोलतात या विषयावरती पंकजा मुंडे यांनी भाष्य केले होते. त्या संदर्भात पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता पवार यांनी पंकजा मुंडे या लहान नेता असल्याचे संबोधले होते. त्याविषयावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होय मी लहान लोकांचीच नेता आहे. ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाला आहे. जो घटक पिचलेला आहे. ज्यांना कोणी वाली नाही, अशा लोकांचे नेतृत्व मी करते. त्यांचाच नेता म्हणून मी आजन्म राहणार आहे. आज जरी मला कुणाचं छत नसले तरी ही सर्वसामान्य जनता हेच माझ कुंटुब आहे, असंही मुंडे सांगितले.

Back to top button