पुणे शहरातील सलग दुसर्‍या दिवशी उष्णतेने काहिली | पुढारी

पुणे शहरातील सलग दुसर्‍या दिवशी उष्णतेने काहिली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशात गुरुवारी दुसर्‍या क्रमांकावर उष्ण ठरलेल्या शहरातील कोरेगाव पार्कचा पारा 41.8 अंशांवर आला. मात्र, शहराचे सरासरी कमाल तापमान 41 ते 42 अंशांवर गेल्याने दिवसभर अंगाची काहिली होत होती. गुरुवारी कोरेगाव पार्कचा पारा 44.4 अंशांवर गेला होता. शुक्रवारी त्यात 2.2 अंशांनी घट झाली व पारा 41.8 अंशांवर आला.

मात्र, शहरातील बहुतांश भागांचे तापमान 41 ते 42 अंशांवर स्थिर होते, त्यामुळे सलग दुसर्‍या दिवशी शहरातील नागरिक म्हणत होते काय हा उन्हाळा आहे? शीतपेये, ताक, आईस्क्रीम खाण्याकडे नागरिकांचा ओढा वाढल्याचे दिसत होते. शहरातील तापलेले भाग लवळे 42, कोरेगाव पार्क 41.8, वडगाव शेरी 41.8, आंबेगाव 41.2, चिंचवड 40.8, शिवाजीनगर 40.8, पाषाण 40.7, हडपसर 40.5, बालेवाडी 40.

Back to top button